आता ‘तुका म्हणे’ हे नामाभिधान जोडणे पडणार महागात
देहू,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्सवप्रिय असलेल्या आपल्या समाजात सणवार आणि दिनविशेषांची काही कमी नाही. या ना त्या कारणाने विविध समाजमाध्यमांवरून शुभेच्छा संदेश ओसंडून वाहत असतात. यामध्ये महापुरुषांच्या नावाने काही अवतरणे लिहून शुभेच्छा संदेश पाठवले जातात. अनेकदा ते त्यातील अवतरणे त्या महापुरुषाची नसतातच आणि न वाचता वैधता न पाहता फॉरवर्ड करण्याच्या आपल्या सवयीमुळे असे संदेश व्हायरल होतात. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आता देहू येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानने कडक भूमिका घेतली आहे.
तरुण वर्गातून संताच्या अभंगाची तोडमोड करून शुभेच्छा पत्र तयार केलं जाते. अनेकदा यामध्ये संत तुकाराम महाराजांचे नामाभिधान ‘तुका म्हणे’ चा वापर केला जातो. संतांच्या नावाचा वापर करून चुकीचे विडंबन करू नये. अन्यथा देहू संस्थाच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार आहे. असा इशारा देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.
केवळ संत तुकाराम महाराज यांच्या “तुका म्हणे” या शब्दाचे विडंबन केल्यावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह; महाराष्ट्रात असणाऱ्या संत, महापुरुष यांचा वापर केल्यास आणि विडंबन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.
SL/KA/SL
5 Dec. 2022