रास्त दरातील औषधांकरता राबवणार मिशन जेनरिक औषधे घराघरात
ठाण, दि. २७ (, एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सामाजिक दृष्टिकोन आणि भारतीयांना रास्त दरातील वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान युवा उद्योजक अर्जुन देशपान्डे यांनी स्वीकारले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त किमतीत औषधे मिळायला पाहिजेत या उद्देशाने वयाच्या १६ व्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनरिक आधार या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती. रतन टाटा यांना आपले प्रेरणास्रोत मानून अर्जुन देशपांडे यांनी किफायतशीर किंमत असणाऱ्या जेनरिक औषधे उपलब्ध करून देण्यास प्राथमिकता दिली होती.देशपांडे यांना ट्रेड टॉकच्या माध्यमातून रतन टाटा यांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देशपांडे यांनी आपला उद्देश आणि कल्पना त्यांच्यासमोर मंडळी होती. समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच आग्रही पावले उचलणाऱ्या रतन टाटा यांनी देशपांडे यांच्या संकल्पना आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले होते.
आपल्यासाठी रतन टाटा हि एक व्यक्ती नसून एक ऊर्जास्रोत होते.त्यामुळे त्यांचे स्वप्न साकारणे हाच आपला आता दृढसंकल्प असल्याचे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले.महाराष्ट्रासह देशातील उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली आणि पंजाबच्या जोडीने १७ राज्यातील नागरिकांना स्वस्त दरातील औषधे अर्जुन देशपांडे पुरवत आहेत. हा आपल्यासाठी केवळ एक उद्द्योग नसून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे, असे अर्जुन देशपांडे म्हणाले.रतन टाटा आणि अर्जुन देशपांडे या जोडीने भारतीय युवकांपुढे एक प्रेरणादायी उदाहरण कायम केले आहे. रतन टाटा यांच्या जयंतीच्या निमीत्ताने दृढ संकल्प आणि योग्य मार्गदर्शनामुळे कुठलेही स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येते असा संदेश अर्जुन देशपांडे यांनी युवकांना दिला आहे.
ML/ SL/ ML
27 Oct 2024