तेजस विमानातून क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी
पणजी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बनावटीच्या आणि नजरेच्या टप्प्यापलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची तेजस विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सुमारे 20,000 फूट उंचीवरून या क्षेपणास्त्राची विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात ही चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी ठरल्याने भारतील हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस LSP-7 ची चाचणी 23 ऑगस्ट रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर ‘ASTRA’ या क्षेपणास्त्राच्या पलीकडे व्हिज्युअल रेंजच्या हवेतून हवेत मारा करण्यात आली. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), डीआरडीओ (DRDO) आणि इतर विभागांशी समन्वय साधून एचएएलने हे यश मिळविले आहे. या यशस्वी चाचणीमुळे ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेलाही बळ मिळाले आहे. या विमानाचे परीक्षण दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानाने केले.
अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र असून ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे. स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून प्रक्षेपण हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
SL/KA/SL
26 Aug 2023