उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया 2024’ चा किताब
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निकिता पोरवालने ‘मिस इंडिया 2024’ चा मान पटकावून उज्जैनसह संपूर्ण देशाचे नाव उज्जवल केले आहे. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा संगम असलेल्या निकिताने आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. तिच्या या यशस्वी प्रवासाने अनेक तरुणींना प्रेरणा दिली आहे. मिस इंडिया 2024 स्पर्धेत निकिताने केवळ तिच्या सौंदर्यामुळे नव्हे तर तिच्या उत्तम संवाद कौशल्यामुळे, समाजासाठी योगदान देण्याच्या इच्छेमुळे आणि दृढ संकल्पामुळे हे विजेतेपद मिळवले आहे. तिच्या या विजयाने तिला एक नवी ओळख आणि देशभरात एक सन्माननीय स्थान मिळवून दिले आहे.
PGB/ML/PGB
17 Oct 2024