तिखट मिरची झाली गोड , मिळतोय 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव…

जालना दि २२:– जालन्यात शेतकऱ्यांची तिखट मिरची गोड झाल्याचं बघायला मिळतंय. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव जिल्ह्यातील मिरचीची बाजरपेठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दररोज 250 ते 300 टन हिरव्या मिरचीची आवक होत असून सध्या मिरचीला बाजारभावही चांगला मिळत आहे. पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारातली मिरची परदेशातही निर्यात केली जात आहे. सध्या या मिरचीला 8 ते 9 हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. ML/ML/MS