सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव मंडळ – मिरा रोडचा महाराजा

 सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव मंडळ – मिरा रोडचा महाराजा

ठाणे दि ३१– मिरा रोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन १९९१ पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी मंडळ आपल्या ३५ व्या वर्षात पदार्पण करत असून, दरवर्षी समाजप्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करते. आजपर्यंत मंडळाने अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांपासून बचाव, रोबोटिक्स, सेल्फ डिफेन्स, आणि महिला सुरक्षेसाठी पोलिसांमार्फत कार्यरत असलेले दामिनी पथक यांसारख्या विषयांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यावर्षी मंडळाने मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त (झोन-१) राहुल चव्हाण, सायबर सेलचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, अमली पदार्थ विरोधी सेलचे संतोष घाडगे, भरोसा सेलच्या संध्या पवार आणि एचसीजी (HCG) कॅन्सर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. यश माथूर यांच्या उपस्थितीत अमली पदार्थांचे दुष्परिणाम (Say No To Drugs), कृत्रिम बुद्धिमत्ता – सायबर गुन्हे (AI vs Cyber Crime), पॉक्सो कायदा आणि कॅन्सरवर आवश्यक उपाययोजना यांसारखे समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केले होते. या सामाजिक कार्यक्रमांद्वारे नागरिकांना वाढत्या धोक्यांविषयी आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आवश्यक उपायांविषयी सखोल माहिती देण्यात आली, असे मंडळाचे पदाधिकारी मितेश चलमेला आणि संकेत मोहिते यांनी सांगितले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *