“मीरा-भाईंदरमध्ये पहिल्यांदाच ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ – विश्वविक्रमी जल्लोषासाठी सज्ज!”

 “मीरा-भाईंदरमध्ये पहिल्यांदाच ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ – विश्वविक्रमी जल्लोषासाठी सज्ज!”

मिरा-भाईंदर दि १४:– प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि नवघर नाक्याची मानाची हंडी वंदना विकास पाटील जनहित संस्थेतर्फे मिरा-भाईंदर शहरात पहिल्यांदाच सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचा गौरव करणारा “संस्कृतीची दहीहंडी २०२५” हा भव्य व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव शनिवारी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी नवघर मराठी शाळा मैदान, हनुमान मंदिरासमोर, नवघर नाका, भाईंदर (पूर्व) येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. भविष्यातील पिढीवर उत्तम खेळाचे संस्कार करणाऱ्या प्रो-गोविंदा या संकल्पनेचा आणि परंपरेचा गौरव करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच मिरा-भाईंदरमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी “संस्कृतीची दहीहंडी २०२५” चे आयोजन महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे योजण्यात आले आहे.

या दहीहंडी उत्सवात खास आकर्षण ठरणार आहे स्पेनमधील मॅरेक्स दे सॅाल्ट (Marrecs de salt) १११ गोविंदा खेळाडूंकडून पहिल्यांदाच मिरा-भाईंदर शहरात देण्यात येणारी ८ थरांची सलामी. या उत्सवाच्या माध्यमातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होणार असून, सर्वांसाठी हि एक अभिमानाची गोष्ट ठरेल.
दहीहंडीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचे बाललीला व त्यांचे शिकवणुकीचे विचार यांचा प्रसार, युवकांमध्ये एकता, शिस्त आणि शौर्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न या “संस्कृतीची दहीहंडी २०२५” मार्फत केला जाणार आहे.

“संस्कृतीची दहीहंडी २०२५” प्रमुख आकर्षण

स्पेनमधील मॅरेक्स दे सॅाल्ट (Marrecs de salt) १११ गोविंदा खेळाडूंकडून ८ थरांची सलामी. प्रथम ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रुपये ५ लाख व आकर्षक ट्रॉफी. प्रत्येक ९ थर लावणाऱ्या पथकास रुपये १ लाख व आकर्षक ट्रॉफी.
तसेच ८, ७, ६ व ५ थर लावणाऱ्या पथकांसाठी विशेष रोख पारितोषिक व ट्रॉफी.
महिला गोविंदा पथकांसाठी विशेष बक्षिसे.

सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना

सर्व पथकांसाठी अपघात विमा योजना.

आयोजक व वैयक्तिक विम्याची सुविधा.
प्रशिक्षित डॉक्टर, अॅम्ब्युलन्स, लाइफ जॅकेट, हेल्मेट यांची उपलब्धता.
उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन.

“संस्कृतीची दहीहंडी २०२५” बद्दल सांगताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात की ,
“मिरा-भाईंदरमध्ये पहिल्यांदाच ठाण्याप्रमाणेच मोठा आणि जल्लोषपूर्वक दहीहंडी उत्सव या वर्षी साजरा होणार आहे. ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ या दहीहंडीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे हा उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून हिंदुत्व, संस्कार आणि परंपरेचा वारसा पुढील पिढीकडे नेण्याचे महत्वाचे कार्य पार पडणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संस्कारांनी प्रेरित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील पिढीवर उत्तम खेळाचे संस्कार करणाऱ्या प्रो-गोविंदा संकल्पनेचा आणि परंपरेचा व संस्कृतीचा गौरव ‘संस्कृतीची दहीहंडी २०२५’ च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”

“संस्कृतीची दहीहंडी २०२५” उत्सवात प्रमुख उपस्थिती

चित्रपट क्षेत्रातील तारेतारका व राजकीय नेते या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहणार आहेत.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *