मीराबाई चानूला जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य

 मीराबाई चानूला जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य

मुंबई, दि. 8 (एमएमसी  न्यूज नेटवर्क) :  कोलंबिया येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू २०२२ च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे.

टोकियो २०२० चॅम्पियन चीनच्या हौ झिहुआसमोर मीराबाईच्या शक्तीचा कस लागला पण अखेरीस मीराबाई चानूने मीराबाईचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे पदक आपल्या नावे केले आहे. दरम्यान, चीनच्या जियांग हुइहुआने २०६ किलो (स्नॅचमध्ये ९३ किलो आणि जर्कमध्ये ११३ किलो) एकत्रित वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

तिने ४९ किलो वजनी गटात एकूण २०० किलो वजन उचलले आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅचच्या तिसऱ्या फेरीत ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या फेरीत ११३ किलो वजन उचलले.

SL/KA/SL

8 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *