मिंट-कोरिअँडर सूप

 मिंट-कोरिअँडर सूप

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: 

पुदिन्याची पाने, कोथिंबीर, आले, लसूण पाकळ्या दोन, मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो एक छोटा चमचा,
गाजर- श्रावण घेवडा बारीक कापून पाव वाटी. कांद्याची पात एक चमचा बारीक कापून. तेल एक चमचा, लिंबूरस/ व्हिनेगार दोन तीन थेंब. एक पेला पाणी. हे दोन वाट्या सूप होइल इतकेच प्रमाण आहे. एका माणसाचे सर्विंग. जितके मेंबर तितके वाढवावे.

क्रमवार पाककृती: 

सर्व भाज्या अगदी ताज्या असाव्यात. जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण सोनेरी रंगावर परतावे. मग त्यात गाजर- श्रावण घेवड्याचे बारीक तुकडे, कांदा पात व अजिनो मोटो घालून परतावे. पण जळू देऊ नये. खमंग वास सुटला की पाणी घालावे व गॅस मोठा करावा. पाण्याला उकळी फुटेस्तो त्यात आल्याचे बारीक तुकडे, पुदिना, कोथिंबीर घालावी. मीठ मिरेपूड चवी नुसार घालावे.
दोन तीन मिनिटे उकळू द्यावे. मग गॅस कमी करून त्यात लिंबूरस किंवा व्हिनेगार दोन तीन थेंब घालावे.

Mint-Coriander Soup

ML/ML/PGB
20 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *