सीमावादानंतर मंत्री लागले कामाला
सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पूर्व भागात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यामुळे सीमा भागाचा वाद उफाळून आल्यावर मंत्रिमंडळ कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
जत तालुक्यातील गुड्डापूर येथून धानम्मा देवीचे दर्शन घेऊन सामंत यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.
दुष्काळी 42 गावातील इरिगेशन तलाव, पाझर तलाव, बंदिस्त पाईपलाईन यासह पाणी योजनांची त्यांनी पाहणी केली. त्या भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.
यावेळी गुड्डापूर, माडग्याळ, मायथळ इत्यादी गावांना भेटी दिल्या. लोकांना या भागात रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी औद्योगिक वसाहत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शिक्षण आरोग्य याबाबत लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या. सदर भागावर कर्नाटक ने दावा केला असून खडबडून जाग्या झालेल्या महाराष्ट्र सरकारने या भागातील अपुऱ्या योजना पूर्ण करण्यावर आता लक्ष केंद्रित केले आहे.
ML/KA/SL
5 Dec. 2022