कर्नाटकच्या कुरापती थांबेनात,आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात बंदी
मुंबई,दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नांटक हा कित्येक वर्ष भिजत पडलेला प्रश्न आता चिघळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्नाटक दररोज काही ना काही गोष्टी करून महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कहर म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला आहे. Ministers of Maharashtra are banned in Belgaum
सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यासह इतर मंत्री उद्या बेळगावचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोम्मई यांनी हा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे सीमा भाग समनव्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि इतर मंत्र्यानाही कर्नाटकमध्ये येवू नये यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविलं आहे. कर्नाटकमधील रामदुर्गमधल्या साळहल्ली इथं पत्रकाराशी बोलताना बोम्मई यांनी हा इशारा दिला आहे. सध्याची दोन्ही राज्यातील परिस्थिती पाहता चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला येवू नये अशी विनंती त्या पत्रात उल्लेख असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे.
दरम्यान बोम्मई गेल्या काही काळांपासून महाराष्ट्रातील कन्नड भाषिक शाळा आणि संस्थांसाठी विविध प्रकारची आर्थिक मदत देऊ करत आहेत. सीमाभागातील महाराष्ट्रातील काही नागरीकही कर्नाटकी नाटकाला भुलुन कर्नाटकात जाण्याची भाषा करत आहेत.
त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नाबाबत काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहीले आहे.
SL/KA/SL
2 Dec. 2022