कोविड बाधा झालेले मंत्री मुंडे घरी राहूनही कार्यरत

 कोविड बाधा झालेले मंत्री मुंडे घरी राहूनही कार्यरत

पुणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या 113 व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली.

या बैठकीत कृषी परिषदेच्या 112 व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल आणि इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

धनंजय मुंडे हे मागील 5 ते 7 दिवसांपासून कोविड बाधित असून ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे. Minister Munde, who is affected by Covid, is still working at home

ML/KA/PGB
26 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *