शिवसेनेच्या नेत्यात झाली मारामारी , विधानपरिषद झाली तहकूब

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा मुद्दा आधी माध्यमात आणि मग विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित झाला. यावरून विधानपरिषदेचे कामकाज तासभर तहकूब करण्याची वेळ उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर उद्भवली.
अशी धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानरिषदेत उपस्थित करत याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली .या घटनेनबद्दल तपासून माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं तसंच तोपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री केसरकर उत्तर देतील असं त्या म्हणाल्या मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली, यामुळे उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं. Minister Dada Bhuse and Shiv Sena MLA Mahendra Thorve
विधानसभेत ही जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि याच्या चौकशी ची मागणी केली, त्यावर मी तर इथेच बसलो आहे असे दादा भुसे यांनी खाली बसूनच सांगितले. मात्र पिठासीन अधिकारी अमीन पटेल यांनी यावर काहीही भाष्य केले नाही.
ML/KA/PGB
1 March 2024