मुंबईतील ट्रान्झिट कॅम्पचे गाळे प्रकल्प बाधितांना

नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनांसाठी बनविण्यात आलेल्या ट्रान्झिट कॅम्प मधील गाळे कायमस्वरूपी प्रकल्प बाधित लोकांना देण्यासाठी विचार केला जाईल, त्याचे प्रमाण किती असावे याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
ही सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती. पाच हजार ४४१ गाळे यासाठी उपलब्ध होते त्यातील आता केवळ २४८ शिल्लक आहेत अशी माहिती ही मंत्री सावे यांनी यावेळी दिली.
दफनभूमी आरक्षण बेकायदा
मुंबईतील गोरेगाव इथे एका खासगी ट्रस्टला दफनभूमी बिना निविदा प्रक्रिया देण्यासाबाबतची चौकशी केली जाईल आणि त्याबाबतचा न्यायालयाचा आदेश तपासण्यात येऊन त्यावर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. योगेश सागर यांनी ती उपस्थित केली होतीMinister Atul Save
ML/KA/PGB
15 Dec 2023