पर्यटनासाठी मिनी पर्यटक ट्रेन सिंधुदुर्गात सुरु होणार…
सिंधुदुर्ग, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपट्टीच्या मार्गाने पर्यटकाना फिरवून आणणारी मिनी ट्रेन सुरु करण्याबाबचा विचार असून, त्याबाबतचा आराखडा व अंदाजपत्रक येत्या तीन महिन्याच्या आत तयार करण्याचे आदेश केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी आणि कोकण रेल्वेसह अन्य संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष बैठकीत दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. म्हणूनच या जिल्ह्यात सागरी किनारपट्टीवरून फिरणारी एक मिनी ट्रेन, त्याचा मार्ग, त्यासाठी लागणारी जमीन, याबाबतचा एक आराखडा येत्या तीन महिन्याच्या आत जिल्हाधिकारी तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी एकत्र बसून तयार करावा असे राणे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नांदगाव ते देवगड पुढे वेंगुर्ला नंतर सावंतवाडी पुन्हा कुडाळ कणकवली व परत नांदगाव अशी मिनी ट्रेन सुरू करून पर्यटकांना पर्यटक सुविधा देण्यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना तयार करावी. याबाबत आपली केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चाही झाली आहे असेही राणे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शहरांना जोडणारी व पर्यटन ठिकाणे व दर्या खोर्यांसह सागरी निसर्गरम्य परिसराची ठिकाने दाखविणारी ही मिनी ट्रेन व त्याचा मार्ग याबाबतचा अंदाजित खर्चाचा आराखडा येत्या तीन महिन्यात तयार व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी या बैठकीत व्यक्त केली.
ML/KA/SL
27 Dec. 2022