इंग्लंडमध्ये पगारवाढीसाठी लाखो कर्मचारी रस्त्यावर

 इंग्लंडमध्ये पगारवाढीसाठी लाखो कर्मचारी रस्त्यावर

लंडन,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्लंडमधील ऋषी सुनक सरकार सध्या त्रस्त झाले आहे. लंडन शहरात लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून महागाई बद्दल निदर्शने करत पगारवाढीची मागणी करत आहेत. या दशकभरातील ही सर्वात मोठी निदर्शने असल्याचे मानले जात आहे.

आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि ट्रेन चालकांचा समावेश आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रोफेसर कॅथरीन बर्नार्ड यांनी द वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, ब्रिटनमध्ये संपाबाबत अतिशय कडक कायदे आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने कोणीही सहजासहजी रस्त्यावर उतरू शकत नाही. तरीही 5 लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले असतील तर ही बाब अति गंभीर आहे.

जानेवारी महिन्यात ब्रिटनच्या महागाईबद्दल प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, देशातील खाद्यांन्नांच्या किमतीमध्ये 13% हून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत विज बिलाच्या आकारणीतही मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान या बाबत बोलताना पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले, ” शक्य असते तर मी जादूच्या कांडीच्या फटक्याने महागाईच्या समस्या तत्काळ दूर केल्या असत्या, पण असे होऊ शकत नाही.”  सुनक सरकारचा असा विश्वास आहे की, जर शिक्षक आणि नागरी सेवकांचे पगार वाढले  ब्रिटनमध्ये आधीच गगनाला भिडलेली महागाई आणखीनच वाढेल.

SL/KA/SL

2 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *