45 रुपये हमी भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक…
जालना, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुधाला प्रति लिटर 45 रुपये हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. जालन्यातल्या जाफराबाद तहसील कार्यालयासमोर लोकजागर शेतकरी संघटनेने निदर्शने केली. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कॅन मधील दूध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध नोंदवला.
शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाचा त्यांना मोल मिळावा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या दुधाला सरकारने 45 रुपये प्रति लिटर हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली. या पावसाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा करावी अन्यथा दुधाचा टँकर मराठवाड्यात फिरू देणार नाही असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला.
ML/ML/SL
4 July 2024