लष्कराच्या तोफखान्याचे धडकी भरवणारे शक्ती प्रदर्शन
नाशिक दि २१– युद्धाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या विविध तोफांनी आज नाशिकच्या देवळीक यांच्या फायरिंग रेंजमध्ये विविध लक्ष्यावर अचूक निशाणा साधत शत्रूच्या वरात धडकी भरविणाऱ्या भारतीय लष्कराच्या शक्तीचे प्रदर्शन घडविले. भारतीय सैन्य दलातील महत्त्वाचा भाग असलेला युद्धाचा देव अर्थात तोफखाना दलाचे प्रात्यक्षिके आज नाशिक मधील देवळाली फायरिंग रेंजमध्ये झाली.
अतिविशिष्ट सेवा मेडल प्राप्त कमांडेड स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तोफखाना दलाच्या प्रात्यक्षिकांमध्ये 120 mm मोटर गन , 130 मिलिमीटर फील्ड लाईट फील्ड गन, इंडियन बोफोस, होवित्झर तोफा, भारतीय लष्करात अलीकडे दाखल झालेली के नाईन वजीर आदी विविध तोफांनी तसेच रॉकेट लॉन्चर रॉकेट आदी तोफा आणि क्षेपणास्त्रांनी दूर अंतरावर असलेल्या बहुला किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगरात मध्यावर ओळख दिलेल्या बहुला वन बहुला टू बहुला थ्री हाथी माथा आदी विविध लक्ष्यावर अचूक मारा केला.
आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडविले या प्रात्यक्षिकात लष्करात कार्यरत असलेल्या चित्ता चेतक या हेलिकॉप्टर्स तसेच आठ हजार फुटावरून हेलिकॉप्टर मधून जमिनीच्या दिशेने झपावलेल्या नाईन पॅराशुट फिल्ड रेजिमेंटच्या पॅरोट उपस्थित भाग घेतला. तोफांचा लक्षावर अचूक मारा करण्याच्या या प्रात्यक्षिकाबरोबर या फायरिंग रेंजच्या परिसरात सध्या लष्करात कार्यरत असलेल्या तसेच नव्याने परीक्षणानंतर लष्करात येणाऱ्या तोफा आणि विविध शस्त्र साहित्याचे प्रदर्शनी भरविण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाला भारताच्या मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळ, तिबेट, म्यानमार , श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेतील काही राष्ट्रांचे सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते.
याशिवाय विविध मुलकी सेवेतील अधिकारी देखील या प्रात्यक्षिकासाठी हजर होते.