एम आय डी सी ने उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे

 एम आय डी सी ने उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरावे

मुंबई, दि. 27  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी एम आय डी सी ने विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावे यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली . यामुळे धरणातील पाणी शिल्लक राहून ते पिण्याच्या वाढत्या गरजेसाठी वापरण्यात येईल असं ते म्हणाले.
प्रश्नोत्तराच्या तासात उल्हासनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न कुमार आयलानी यांनी उपस्थित केला होता, त्याला प्रताप सरनाईक, गणपत गायकवाड , बालाजी किणीकर , किसन कथोरे, जितेंद्र आव्हाड, अजित पवार आदींनी अनेक उपप्रश्न विचारले .
ठाणे जिल्ह्यातील काळू हे धरण बांधण्याचे काम आधी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवून करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११६ वाहनांची नोंदणी बेकायदा पद्धतीने केल्याने त्यांची नोदणी रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली, याप्रकरणी पोलिसांनी चार खासगी आणि पाच सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं ही त्यांनी सांगितलं.

एम पी एस सी मार्फत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तत्कालीन मराठा आरक्षित मात्र न्यायलायाच्या निर्णयामुळे नियुक्त होऊ न शकलेल्या सर्व उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात नियुक्त्या दिल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली , याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता, त्याला अशोक चव्हाण यांनी उपाप्रश्र्न विचारला होता.

ML/KA/SL

27 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *