महिंद्राच्या स्वेच्छा निवृत्ती कामगारांना मिळाला न्याय

 महिंद्राच्या स्वेच्छा निवृत्ती कामगारांना मिळाला न्याय

मुंबई, दि.12
महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर डिव्हिजन मधील कामगारांनी दिनांक 29 सप्टेंबर 1999 रोजी मराठी नोटीस च्या अनुषंगाने स्वच्छा निवृत्ती घेतली होती. त्यावेळी एकूण 153 जणांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यावेळी त्यांना कंपनीतून बाहेर गेल्यावर जी रक्कम नियमानुसार देय होती तीन न दिल्यामुळे प्रत्येक कामगाराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्याचा संपूर्ण अभ्यास करून कंपनीतील कामगारांनी एकत्र येऊन सन 2000 साली कामगार न्यायालयात जाऊन फसवणुकीचा दावा दाखल केला आणि अथक परिश्रमानंतर सर्व कामगारांना 25 वर्षानंतर योग्य तो न्याय औद्योगिक न्यायालयाकडून मिळाला. त्यामध्ये कोर्टात गेलेल्या एकूण 18 कामगारांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाने आदेश महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर डिव्हिजन यांना देण्यात आले. या निर्णयामुळे कामगार जगतामध्ये एक नवीन व्यापक प्रमाणावर चिकाटीने काम केल्यास योग्य तो न्याय मिळू शकतो हे सिद्ध झाले. हे करत असताना स्वेच्छा निवृत्ती कामगार १) श्री विजय वेंगुर्लेकर हेवी मशीन शॉप
२) श्री भगवान पारकर गियर शॉप
३) श्री एन डी देशपांडे कॅम अँड क्रांक विभाग यांनी गेली पंचवीस वर्ष विश्वासाने सर्व आर्थिक हिशोब व्यवस्थित ठेवून वेळोवेळी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जमा खर्चाची बाजू व्यवस्थित संभाळून अत्यंत विश्वासाने एक बाजू भक्कमपणे सांभाळली. यामध्ये त्यांच्या कुटुंबाकडून सुद्धा आम्हाला बरेच सहकार्य झाले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानावे तेवढे थोडे आहेत
४) श्री भानुदास वायंगणकर टूल रूम विभाग
५) श्री पीसी भट हेवी मशीन शॉप या व्यक्तीने प्रथम कंपनीच्या विरोधात एक छोटेसे बीज रोवले त्याचा 25 वर्षात एक मोठा वटवृक्ष तयार झाला त्याची फळे सर्व 153 सेवानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना मिळणार आहे जे कामगार कोर्टाकडे आले नव्हते त्यांनी स्वतः वकील घेऊन कोर्टाकडे जावे. आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन गजानन नागे यांनी केले आहे.
KK/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *