सामाईक प्रवेशासाठी एमएचसीईटी कॅप मोबाईल ॲप
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्षे 2023 -24 च्या प्रवेशाकरिता सीईटी सेल मार्फत उमेदवारांना अर्ज सादर करता यावेत. यासाठी ऑनलाईन ॲपलिकेशन सोबत एमएचसीईटी कॅप मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मोबाईल ॲप चे उदघाटन आजउच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान सिंहगड येथे करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेन्द्र ब. वारभुवन,प्रवेश नियामक प्राधिकरणचे अध्यक्ष जे.पी. डांगे, परीक्षा समन्वयक डॉ.मंगेश निकम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.पाटील म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आज तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या ०३ अभ्यासक्रम बीई/बीटेक ४ वर्ष, , एमई/एमटेक ०५ वर्ष, बी.एचएमसीटी व कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ०९ अभ्यासक्रम बी.एस्सी. (ऑनर्स), कृषी, बी. एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी. एफ.एस्सी. मत्स्यविज्ञान, बी. एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान, बी. टेक. जैवतंत्रज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्नतंत्रज्ञान, बी. एस्सी. (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा एकूण १२ अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन प्रणालीचे आज उद्घाटन करण्यात आले.
यासाठी अर्ज सादर करण्याकरीता मॉबाईल ॲप विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबतची अधिक माहिती वेळोवेळी राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. याची सर्व विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्था यांनी नोंद घ्यावी असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
ML/KA/PGB 24 Jun 2023