मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील मेट्रो -१० ची निविदा ऑगस्ट अखेरपर्यंत

मुंबई दि २१ — मीरा-भाईंदर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीची दर्जेदार सेवा पुरवण्याच्या उद्देशाने मेट्रो- १० ची निविदा प्रक्रिया या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात बोलावलेल्या मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील विविध विकास कामाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल व विक्रम कुमार तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मेट्रो-१० च्या कामाबरोबरच फाउंटन ते घोडबंदर या रस्त्याचा देखील विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाची निविदा एकाच वेळी काढून त्या कामाला गती द्यावी. जेणेकरून मेट्रोच्या सुविधे बरोबरच येथील वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य जनतेची सुटका होईल.
नव्याने होत असलेल्या मेट्रो-१० च्या स्थानकांना तेथील सर्वसामान्य जनतेच्या मागणीनुसार प्रचलित स्थानिक गावाची व परिसराची नावे देण्यात यावीत. जेणेकरून तिथले मुळ रहिवासी असलेल्या आगरी- कोळी समाजाची संस्कृती जपली जाईल. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले. त्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने याबाबतचा अहवाल मीरा-भाईंदर महापालिकेकडून मागून घ्यावा. अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.
महापालिका हद्दीतील रस्त्याच्या कामाला गती द्या
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महापालिका हद्दी मध्ये सुरू असलेल्या विविध ४७ रस्त्याच्या कामांना गती द्यावी व ते लवकरात लवकर पूर्ण करावेत असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले. त्या अनुषंगाने कामे सुरू असुन ४७ रस्त्या पैकी ३५ रस्त्याची काम पूर्ण झालेली आहेत. उर्वरित १२ रस्त्याची ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मला? ML/ML/MS