चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो (मेट्रो लाईन २बी) धावणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. मुंबई मेट्रो यलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी येत्या १६ एप्रिलपासून सुरू होईल. हा मार्ग एकूण ५.४ किलोमीटर लांबीचा असेल. या मार्गावरील पाच स्थानकांची (डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले) कामे पूर्ण झाली आहेत. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या निरीक्षणाखाली ही चाचणी केली जाणार आहे. त्यानतंर लवकरच ही मेट्रो मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.