मुंबईतील प्रवासासाठी मेट्रो वन कार्ड, कोकण रेल्वे ही मुख्य रेल्वेत

 मुंबईतील प्रवासासाठी मेट्रो वन कार्ड, कोकण रेल्वे ही मुख्य रेल्वेत

मुंबई,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर रेल्वे सेवा अधिक सुधारण्यावर भर असणार आहे. मुंबईला ग्लोबल मॅपवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून मुंबईला मनोजरंजनासाठी जागतिक राजधान बनवण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे, असे म्हणत मुंबईत झालेल्या फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईसह महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यात.

केंद्र सरकार महाराष्ट्रात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्राला रेल्वे बजेटमधून 23 हजार 700 कोटी मिळाले. गोदिया ते बल्हारशहा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, केंद्रकडून 4,819 कोटींचा निधी देण्यात आला आहे. 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, यात CSMT स्थानकाचा समावेश आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार असून या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे.

महामुंबईसाठी एकच तिकीट-

एमएमआर रिजन म्हणजेच महामुंबई भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही ठाणे, कल्याण कोणत्याही भागातून रेल्वेने प्रवास करा. ठाणे महानगरपालिकेच्या बसने प्रवास करा अथवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बसनं प्रवास करा. अथवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बसनं म्हणजेच बेस्टने प्रवास करा किंवा मेट्रोने प्रवास करा. तुम्हाला सर्वांसाठी एकच तिकीट आता काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. यासाठी मुंबई वन कार्ड तयार करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी ‘मुंबई 1’ कार्ड लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या एकाच कार्डवर बस, लोकल, मेट्रो यांचा प्रवास करता येणार आहे. पुढील एका महिन्यात याचा आराखडा तयार होईल. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे तिकीट काढणे आणि दाखविण्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे.

SL/ML/SL11 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *