मेट्रो येथील भुयारी मार्गाच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य
मुंबई, दि २६
मेट्रो येथील भुयारी मार्गाच्या बाजूला असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना ये जा करणे देखील त्रासदायक झालेले आहे. मेट्रो येथे अनेक खाजगी कंपनी तसेच सरकारी कंपनीचे कार्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. तसेच या भुयारीच्या बाजूलाच मेट्रो थेटर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येत असतात. त्यांना देखील या कचऱ्याचा आणि गोण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारामध्ये या गोण्या आणि कचरा न दिसल्याने या गोण्यामध्ये पाय अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी या ठिकाणी असलेल्या कचरा आणि सिमेंटचे गोण्या या त्वरित उचलाव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी, पादचारी आणि दुकानदार करत आहेत.
मी रोज संध्याकाळच्या वेळेस याच पदापदावरून क्लासमधून येत असते परंतु गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी कचरा साचलेला असल्याने आणि काळोखामध्ये या गोण्या दिसत नसल्याने या ठिकाणी पाय अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी या गोण्या त्वरित उचलाव्यात अशी मागणी सानिका कोथिंबिरे या विद्यार्थिनींने केली आहे. मेट्रो जवळ असलेल्या या पदपथावर कचरा असल्याचे अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत त्यानुसार मी वॉर्ड ऑफिसर यांना पत्र लिहिलेला असून लवकरच या पदावरील संपूर्ण कचरा पूर्णपणे साफ करण्यात येईल आणि हे पदपथ नागरिकांसाठी मोकळे होईल अशी माहिती स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांनी दिली. KK/ML/MS