मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो प्रकल्प ३ मधील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महसूल विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना मिळणाऱ्या घरांच्या दस्त नोदंणीत मोठी सवलत देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पबाधिकांना आता आपल्या मालमत्ता केवळ १ हजार रुपयांत नोंदविता येणार आहेत.सदर निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प ३ मधील ३० इमारतींतील रहिवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
मेट्रो ३ ही मुबंईच्या पोटातून धावणारी पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. ही मेट्रो कुलाबा ते वांद्रे- सिप्झ या मार्गावर धावणार आहे. या मार्गिकेवरील गिरगाव आणि काळबादेवी स्थानकामुळे एकूण ३० इमारती बाधीत झाल्या आहेत. या बाधीत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत लि. मार्फत कायमस्वरुपी पुनर्वसन केले जात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता हस्तांतरित करावयाच्या सदनिकांच्या दस्ताऐवजांवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावर सुट मिळण्याची विनंती महसूल विभागाला केली होती.
त्यानुसार महसूल विभागामार्फत मुद्रांक शुल्क विभागाने मुद्रांक शुल्कात सवलत देण्याता प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे सादर केला होता. या प्रस्तावात मेट्रो ३ प्रकल्पातील गिरगाव आणि काळबादेवी स्थानकामुळे बाधित झालेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या तसेच म्हाडामार्फत/ एमएमआरसी मार्फत पात्र ठरविण्यात आलेल्या रहिवासी/भाडेकरू/गाळेधारक इ. प्रकल्पग्रस्त व्यक्तींना घर/गाळे वाटप करताना करण्यात येणाऱ्या दस्तऐवजास लोकहितास्तव १००० रुपये इतके मुद्रांक शुल्क आकारून उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्यास विनंती केली होती. त्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
ML/ML/PGB
30 Sep 2024