Meta ने लाँच केले Text चे Music मध्ये रूपांतर करणारे AI टुल

 Meta ने लाँच केले Text चे Music मध्ये रूपांतर करणारे AI टुल

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

आजकालचा परवलीचा शब्द म्हणजे AI. अलिबाबाच्या जादूच्या दिव्यातील राक्षसाप्रमाणे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान दररोज आपले नव नवीन अविष्कार दाखवून आश्चर्यचकीत करत आहे. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना याचा फटका बसेल असे म्हटले जात असून काही प्रमाणात ते खरे असल्याचेही हळूहळू स्पष्ट होत आहे. याचे कारण म्हणजे आता मेटा ने यूजर्सकरता पुन्हा एकदा नवीन फिचर आणले आहे. मेटा ने वापरकर्त्यांसाठी एक अप्रतिम ओपन सोर्स एआय टूल लाँच केले आहे.या टूलचे नाव आहे ऑडिओक्राफ्ट (Audiocraft) व्यावसायिक संगीतकार आणि संगीत बनवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांना या साधनाचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे मेटाने हे AI टूल ओपन सोर्समध्ये ठेवले आहे. म्हणजेच, कोणीही त्यांच्या डेटासेटच्या आधारे या एआय टूलला प्रशिक्षण देऊ शकतो.

मेटा (Meta) ने तीन प्रकारांमध्ये हे AI Tool लाँच केले आहे. AudioGen, MusicGen आणि EnCodec असे हे माॅडेल्स आहेत. यातील MusicGen माॅडेल तुम्ही टाईप केलेल्या Text चे रूपांतर गाण्यात करेल. तर AudioGen ला पब्लिक साऊंड इफेक्टची ट्रेनिंग देण्यात आली आहे. जे प्रामुख्याने Text इनपुटच्या मदतीने ऑडिओ जनरेट करण्याचे काम करेल. EnCodec मध्ये सुधारणा करण्यात आली असून या टूलच्या मदतीने तुम्ही उच्च दर्जाचे संगीत तयार करू शकाल.

कंपनीने सांगितले की AI ने फोटो, व्हिडिओ आणि मजकूरात वेगाने प्रगती केली आहे, परंतु ऑडिओच्या भागात एआयचा फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे कंपनीने ऑडिओक्राफ्ट लाँच केले आहे. जे उच्च दर्जाचे ऑडिओ तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. या एआय टूलच्या मदतीने यूजर्स त्यांच्या कामात अनेक गोष्टींचा आवाज वापरू शकतात. जसे कुत्र्याचे भुंकणे, पक्ष्यांचा किलबिलाट इ. तसेच हे AI Tool लॉन्च केल्यावर, काही कलाकार आणि उद्योग तज्ञांनी कॉपीराइट उल्लंघनाबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे.

SL/KA/SL

3 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post