फेसबुक मेटाच्या देशातील प्रमुखपदी भारतीय महिला

 फेसबुक मेटाच्या देशातील प्रमुखपदी भारतीय महिला

मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजमाध्यम क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या मेटा ( Meta) च्या भारतातील प्रमुखपदी आता संध्या देवनाथन Sandhya Devnathan यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या मेटा आशिया पॅसिफीकच्या गेमिंग बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीपासून त्या मेटाच्या भारतातील प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील. Meta has appointed new Head and VP Indian Operations – Sandhya Devnathan

अनेक हाय प्रोफाइल व्यक्ती मेटा कंपनीतून बाहेर पडल्यानंतर संध्या यांची भारतातील प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. मेटाचे भारतातील  प्रमुख अजित मोहन (Ajit Mohan), सार्वजनिक धोरणासाठी कंट्री लीड राजीव अग्रवाल (Rajeev Ageawal) आणि WhatsApp चे भारत प्रमुख अभिजित बोस  (Abhijeet Bose)यांनी मेटामधुन राजीनामा दिला आहे. अजित मोहन यांनी प्रतिस्पर्धी कंपनी स्नॅपचॅटमध्ये (Snap Chat) प्रमुख भूमिका घेण्यासाठी राजीनामा दिला, तर इतर दोन राजीनाम्यांची कारणे अद्याप अज्ञात आहेत.

काही दिवसांपूर्वीच मेटाने 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढून टाकल्याचे वृत्त आहे.

मेटा कंपनी बाबत जाणून घ्या.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ही लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स  मेटा कंपनीच्या मालकीची आहेत. मार्क झुकरबर्ग हा मेटाचा संस्थापक आहेत.

मेटा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान समूह असून मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया येथे कंपनीचे मुख्यालय आहे.

SL/KA/SL
17 Nov. 2022

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *