मर्लिन सवांत : जगातील सर्वात बुद्धिमान महिला
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मर्लिन मॅच व्होस सवांत या “आस्क मर्लिन” या अमेरिकन नियतकालिकाच्या लेखिका होत्या. इथे त्या विविध प्रश्नांची उत्तरं द्यायच्या, विविध विषयांवर त्यांचे विचार मांडायच्या.
त्यांनी चरित्रं, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. शिवाय त्या गुंतवणूक उद्योगातही काम करत होत्या. लहानपणी त्यांना एक टोपणनाव मिळालं होतं.
एका आयक्यू टेस्ट मध्ये त्यांना 228 गुण मिळाले होते जे सरासरीपेक्षा दुप्पट होते.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकात त्यांच्या नावाची नोंद असून 1985 ते 1989 या काळातील सर्वांत बुद्धीमान महिला असल्याचा मान त्यांना मिळाला होता. सोबतच त्या जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती होत्या.
व्होस सवांत यांचे आईवडील युरोपियन स्थलांतरीत होते. 8 मार्च 1946 रोजी अमेरिकेच्या मध्यभागी असलेल्या मिसूरी येथील सेंट-लुईस शहरात त्यांचा जन्म झाला. Merlin Savant: World’s Most Intelligent Woman
त्यांचं म्हणणं होतं की, लोकांनी त्यांच्या आई आणि वडील अशा दोघांचीही आडनावं लावायला हवीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईचं सवांत हे आडनाव आपल्या नावामागे लावलं होतं. फ्रेंच मध्ये या शब्दाचा अर्थ आहे “बुद्धीमान व्यक्ती”
शाळेत असतानाच त्यांनी विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी स्टॅनफोर्ड-बिनेट आणि हॉफ्लिनच्या मेगा इन्स्टिट्यूटमध्ये आय क्यू चाचणी केली होती. यात त्यांना 228 गुण मिळाले होते.
ML/KA/PGB
30 Nov 2023