एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा ‘मेरीकी -२०२५’ प्रदर्शन गुरुवारपासून

 एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा ‘मेरीकी -२०२५’ प्रदर्शन गुरुवारपासून

पुणे, दि १८: एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनतर्फे ‘मेरीकी २०२५’ या प्रतिष्ठित प्री-ग्रॅज्युएशन डिझाइन प्रदर्शनाचे ११वे आवर्तन जाहीर करण्यात आले आहे. हे त्रिदिवसीय प्रदर्शन २०, २१ व २२ नोव्हेंबर २०२५ रोजी कोपा मॉल, कोरेगाव पार्क, पुणे येथे, सकाळी १०.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत होणार आहे.

या प्रदर्शनात बी.डिझाइन आणि एम. डिझाइनच्या ५०० पेक्षा अधिक अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. ऍनिमेशन डिझाइन, फिल्म अ‍ॅन्ड व्हिडिओ डिझाइन, ग्राफिक डिझाइन, इंटिरिअर स्पेस अ‍ॅण्ड फर्निचर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, युजर एक्स्पिरियन्स डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन डिझाइन, रिटेल अ‍ॅण्ड एक्झिबिशन डिझाइन, डिझाइन मॅनेजमेंट, फॅशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मार्केटिंग, इन्फॉर्मेशन डिझाइन अ‍ॅण्ड डेटा व्हिज्युअलायझेशन, इमर्सिव्ह मीडिया डिझाइन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप तसेच ऑटोमोटिव्ह क्ले स्कल्प्टिंग या विविध शाखांतील प्रकल्प यामध्ये प्रदर्शित होणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन लँडोर इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री. अर्णब रे यांच्या हस्ते होणार असून, ते पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगातील बदलत्या प्रवाहांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.नचिकेत ठाकूर यांनी दिली.

मेरीकी २०२५ चे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., डिझाइन संकुलाचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर आणि सह-अधिष्ठाता प्रा. डॉ. दांदेस्वर बिसोई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नेतृत्वात सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्शिया कपूर (प्रमुख, फॅशन विभाग), सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित सिन्हा (प्रमुख, फाऊंडेशन विभाग) व विष्णू के. एस. (प्रमुख, मेकर्स स्पेस) यांचा सहभाग आहे.

या वर्षीचे आकर्षण म्हणजे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी होणारा फॅशन शो, ज्यामध्ये फॅशन डिझाइन शाखेचे विद्यार्थी आपली अंतिम कलेक्शन्स सादर करणार आहेत.

मेरीकी २०२५साठी आयोजकांकडून उद्योगातील तज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी, डिझाइन व्यावसायिक, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच सर्व रसिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *