नागपुरात पारा घसरला, पारा 8.2 अंश
नागपूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या लाटेची स्थिती जाणवत आहे. नागपुरात तापमानाची घसरण सुरू असून नागपूरात पारा 8.2 अंशावर पोहोचला आहे. सांयकाळी आणि सकाळच्या वेळेला नागरिक स्वेटर, टोपी आणि मफलर घालून बाहेर पडत आहेत. शाळकरी मुले देखील स्वेटर घालूनच शाळेत जात आहे. काल दुपारच्या वेळेला देखील थंडी जाणवत होती. मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक देखील स्वेटर घालून मॉर्निंग वॉक करीत आहेत.
SL/ML/SL
10 Jan. 2024