सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उभारली जाणार मानसिक आरोग्य प्रयोगशाळा
मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सुमारे ९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मानसोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा फायदा होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक संशोधन व सखोल अभ्यास करता यावा यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मानसिक आरोग्य प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसोपचार विभागाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमातील अभ्यासावर आधारित आणि मानसोपचार विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानसिक आरोग्य प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. Mental health laboratories to be set up in all medical colleges
SL/ KA/ SL
18 Nov. 2023