पुरुषांचे अस्तित्व धोक्यात? Y गुणसुत्रे होतायत कमी, संशोधनातून खुलासा

 पुरुषांचे अस्तित्व धोक्यात? Y गुणसुत्रे होतायत कमी, संशोधनातून खुलासा

जगभरातील पुरुषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एका संशोधातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुरुषांमधील Y गुणसूत्र सतत कमी होत असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे.एखाद्या महिलेच्या गर्भात वाढत असलेले भ्रूण पुरूष असेल की स्त्री हे त्याच्या आई-वडीलांच्या गुणसूत्रांवरून निश्चित होते. म्हणजेच महिलांच्या शरीरात दोन X (एक्स) गुणसूत्र तर पुरुषांच्या शरीरीत एक X आणि एक Y (वाय) गुणसूत्र असतात. महिला आणि पुरूष यांच्याचील XX गुणसूत्र एकत्र आल्यास भ्रूण स्त्री बनते आणि जेव्हा XY गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा भ्रूण हे पुरूष बनते. म्हणजेच मुलगा जन्माला येण्यासाठी Y गुणसूत्र असणे गरजे असते. जर पुरूषांमधील Y गुणसुत्र नष्ट झाले तर मात्र जगात मुले जन्मालाच येणारच नाहीत.

अशात एका रिसर्चमध्ये याबद्दलचा धोका वर्तवण्यात आला आहे. सायंस अलर्टच्या रिपोर्टमधील अभ्यासात असे आढळून आले आहे की Y गुणसूत्र कालांतराने कमी होत आहे. Y क्रोमोसोमचे संकोचन लाखो वर्षांपासून सुरू असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. याचे कारण असे की Y गुणसूत्र इतर गुणसूत्रांपेक्षा अधिक वेगाने उत्परिवर्तन करतो. याव्यतिरिक्त, Y क्रोमोसोममध्ये इतर गुणसूत्रांपेक्षा कमी जीन्स असतात, ज्यामुळे ते आकुंचन होण्याची अधिक शक्यता असते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *