जातप्रमाणपत्र नसल्याने ११ सरपंचासह ४०२ सदस्यांचे सदस्यत्व रद्द…
बीड, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील ११ सरपंचासह ४०२ जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे. २० जानेवारी रोजी जिल्ह्यात ७ तालुक्यातील १३ सरपंच तर ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ४ तालुक्यातील ११ सरपंचासह ४०२ जणांना दणका देत त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आलीय. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकांपासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र २०२० ते २५ या कालावधीत झालेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीय. त्यांचे काही आक्षेप असेल त्याच्या सुनावण्या घेऊन निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ML/ SL/ ML
3 Feb. 2025