मेधा कुलकर्णी मुळे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर – राहुल डंबाळे यांचा गंभीर आरोप
पुणे, दि २४: शनिवार वाडा येथील कथित नमाज प्रकरणाच्या निमित्ताने शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेले बेकायदेशीर आंदोलन व त्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ही पुणे शहराला दंगलीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारी असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली आहे यावेळी त्यांच्या समवेत कोंढवा येथील माजी नगरसेवक एडवोकेट हाजी कपूर पठाण हे देखील उपस्थित होते
19 ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा येथे यापूर्वी नमाज अदा केल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समवेत परवानगी न घेता शनिवार वाड्यात घुसून आंदोलन केले आहे पोलिसांचे आदेश न जुमानता त्यांनी शुद्धीकरणाचा घाट घातला आहे ही बाब खासदार म्हणून अत्यंत अशोभनीय आहे तसेच यानंतर या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेली वक्तव्य ही धार्मिक तेढ निर्माण करणारी व दंगलीला प्रोत्साहन देणारी असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आली आहे
मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे कसबा पेठ येथील छोटा शेख सालाउद्दीन दर्गा येथे कृती केली होती त्यानंतर पुन्हा अशा प्रकारची कृती ही शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा इरादा आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवला जाईल अशी स्पष्ट भूमिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने घेण्यात येत आहे
पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केल्यानंतर सविस्तर त्यांच्या निदर्शनास आणून दिली असून याप्रकरणी आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करू असे त्यांनी आश्वासन दिले
हिंदू मुस्लिम ऐक्य साधने ऐवजी धार्मिक ध्रुवीकरण करून शहराला वेठीस धरणे मेधाताई कुलकर्णी सारखा सुसंस्कृत राज्यकर्त्यांकडून अपेक्षित नाही या घटनेमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असून यावर कारवाईची मागणी करत असल्याचे एडवोकेट गफूर पठाण यांनी सांगितले.KK/ML/MS