आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांसाठी १४४० जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार ही पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
या भरतीसाठी एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवी/डिप्लोमाधारक उमेदवार पात्र ठरतील. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची आणि अंतिम मुदत लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल. वयाची अट आणि अर्ज शुल्काबाबतची माहिती देखील लवकरच जाहीर केली जाईल.
SL/ML/SL