भारत जोडो न्याय यात्रेसाठी पोलीस महासंचालकांशी भेट

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या दि. १२ मार्च रोजी नंदूरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. या यात्रेच्या आणि १७ मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणा-या इंडिया आघाडीच्या सभेच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आज सकाळी ११ वा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
ML/ML/SL
11 March 2024