राज्यात HMPV रुग्णांसाठी लवकरच बैठक
कोल्हापूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सापडलेल्या एचएमपीव्ही रुग्णांबाबत लवकरच येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले.
सोशल मीडिया आणि येणाऱ्या इतर बातम्यांमधून गैरसमज निर्माण होत आहेत मात्र कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. देशात सापडलेल्या एचएमपीव्ही रुग्णांबाबत लवकरच येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक घेणार आहे. संसर्गजन्य आजाराबाबतच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी जनतेला केले आहे.
कोरोना सारख्या मोठ्या आजाराला याच आरोग्य विभागाने परतवून लावले होते, अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांना महत्त्व द्या , मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असेही आबिटकर यांनी सांगितले.
ML/ML/SL
6 Jan. 2024