*जीवनात स्थैर्य आणि शांततेसाठी ध्यानधारणा आवश्यक

मुंबई, दि ६: जीवनात खऱ्या अर्थाने सुख आणि शांतता हवी असेल तर मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. तेव्हा लहान मुलापासून वृद्धापकाळापर्यंत जगण्याची कला म्हणजे ध्यानधारणा होय,अशा सोप्या साध्या भाषेत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या व्याख्यात्या वंदनादिदी यांनी येथे जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना जगण्याचे तत्व सांगितले.
येत्या ६ ऑगस्ट रोजीच्या रक्षाबंधना निमित्ताने आज रक्षाबंधनचा सोहळा कॉलेज कॅन्टीनमध्ये संपन्न झाला.त्यावेळी ध्यानधारणा या विषयावर प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या व्याख्यात्या वंदना दीदी बोलत होत्या. जी डी आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या प्राचार्य वृषाली व हेगडमल, राष्ट्रीय मिल मजूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी साई निकम,प्रसिद्धीप्रमुख काशिनाथ माटल व्यासपीठावर होते.
वंदनादिदी यांनी जीवनातील ध्यानधारणा( मेडीटेशन)चे महत्व पटवून देताना सांगितले, आजच्या धकाधकीच्या जीवनात संयम, शिस्त आणि नियंत्रण हे गुण”औषध” म्हणून उपयोगात आणले गेले तर यश फार दूर नसते.अध्यात्म आणि मानवतावाद या विषयावर विवेचन करून वंदनादिदी यांनी सांगितले की, परस्पर स्नेह आणि प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी रक्षाबंधना सारखे अन्य प्रभावी साधन नाही.
जी.डी आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य वृषाली हेगडमल म्हणाल्या, ध्यानधारणा (मडिटेशन)आज जीवन सफल करताना महत्त्वाचे ठरले आहे.जागतिक योग अभ्यासक शिस्टर शिवाणी यांचे या संदर्भातील विचार मार्गदर्शक ठरतात.सर्वशी खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी आजच्या विद्यार्थ्यांना योगविषयक विचार किती उपयुक्त ठरतात हे सांगितले. KK/ML/MS