स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचे कडक धोरण, होणार मोठी सशुल्क कारवाई

 स्वच्छतेसाठी मुंबई मनपाचे कडक धोरण, होणार मोठी सशुल्क कारवाई

मुंबई, दि. 2 : मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने व्यापक नियमावली लागू केली आहे. या नियमांनुसार सार्वजनिक स्थळी थुंकल्यास २५० रुपये, कचरा टाकल्यास ५०० रुपये, ओला व सुका कचरा वेगळा न केल्यास २०० रुपये तर विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास थेट २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही कठोर दंडात्मक कारवाई केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहरी स्वच्छता मानकांशी सुसंगत आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, जागतिक स्तरावर महत्त्वाचे महानगर आहे. येथे लागू करण्यात आलेले घनकचरा व्यवस्थापनाचे नियम UN-Habitat आणि Sustainable Development Goals (SDGs) यांच्याशी सुसंगत आहेत. विशेषतः SDG 11 (Sustainable Cities and Communities) आणि SDG 12 (Responsible Consumption and Production) या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मुंबईचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरते.

या उपविधींमध्ये निवासी, व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक तसेच सर्व प्रकारच्या आस्थापनांचा समावेश असून, प्रत्येकाने ‘स्वच्छ परिसर’ सुनिश्चित करणे ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. घनकचऱ्याचे विलगीकरण, पुनर्प्राप्ती सुविधा (MRF), जैव-वैद्यकीय कचरा, ई-कचरा, प्लास्टिक कचरा आणि बांधकाम राडारोडा यासंदर्भात सविस्तर नियमावली तयार करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे मुंबई शहर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात स्वच्छता आणि शाश्वत शहरी व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाईल. जागतिक महानगरांमध्ये वाढत्या प्रदूषण आणि कचऱ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे ठरत आहे.

डॉ. अश्विनी जोशी यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. हे नियम केवळ दंडात्मक नाहीत, तर जागतिक स्तरावर शाश्वत शहर घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत.”

दंड आकारणी
रस्ते / गल्ल्या / पदपथ / बाग / सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रूपयांचा दंड आकारला जाईल. शिवाय थुंकल्यास 250 रूपये दंड भरावा लागेल. खुल्या आणि सार्वजनिक जागांवर आंघोळ करणे ही महाग पडणार आहे. अशा लोकांना 300 रूपये दंड भरावा लागेल. तर लघवी करणे 500,शौच करणे 500, मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे 500, सार्वजनिक ठिकाणी भांडी,कपडे, इतर कोणत्याही वस्तू धुणे 300 , वाहन धुणे 500 रूपये दंड आकारला जाणार आहे. अंगण स्वच्छ न ठेवणे ही यापुढे गरजेचे आहे. तसे न केल्या 500 ते 1500 रूपये दंड होवू शकतो.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *