’हेल्थ आणि टेस्ट’ दोन्ही एकत्र मॅकडोनाल्ड्सच्या नव्या उपक्रमाचं लॉंचिंग मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीथी.

 ’हेल्थ आणि टेस्ट’ दोन्ही एकत्र मॅकडोनाल्ड्सच्या नव्या उपक्रमाचं लॉंचिंग मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीथी.

दि. २४ जुलै २०२५: मुंबई, वरळी
आज वरळीतील एट्रिया मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मॅकडोनाल्ड्स इंडिया (West & South) तर्फे आरोग्यदृष्ट्या पोषणमूल्य असलेल्या नव्या खाद्यउत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

मा. मंत्री महोदयांनी आपल्या भाषणात आपल्या कॉलेज जीवनातील मॅकडोनाल्ड्सशी असलेल्या भावनिक आठवणी सांगत कार्यक्रमाची सुरुवात केली. ते म्हणाले,
“आजचं हे इनोव्हेशन एक केवळ व्यावसायिक नवकल्पना नसून, आरोग्यदृष्टिकोनातून घेतलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आजच्या तरुण पिढीला आपण काय खातो, त्यात काय पोषणमूल्य आहे, याबाबत पूर्ण जाणीव आहे. अशा काळात ‘चव आणि आरोग्य’ यांचं संतुलन राखणं ही काळाची गरज आहे, आणि मॅकडोनाल्ड्सने यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.”

तसेच त्यांनी हेही नमूद केलं की,
“महाराष्ट्र FDA विभाग अन्नाच्या गुणवत्तेबरोबरच पोषणमूल्यावरही भर देतो. हे मिशन केवळ सरकारी विभागांनीच पूर्ण करता येत नाही, यासाठी उद्योग, वैज्ञानिक संस्था आणि शासन यांचं संयुक्त सहकार्य आवश्यक आहे.”

या उपक्रमात मान्यवर उपस्थित होते:
श्री. अक्षय जाटिया, CEO, Westlife Foodworld, श्री. सौरभ कालरा, व्यवस्थापकीय संचालक, Westlife Foodworld, डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग, संचालक, CFTRI (Central Food Technological Research Institute) उपस्थित होते.

श्री. कदम यांनी वैज्ञानिकांकडून ५ ग्रॅम प्रथिने एका छोट्या स्लाइसमध्ये पुरवणाऱ्या मेहनतीचं विशेष कौतुक केलं. त्यांनी आपल्या भाषणात हे देखील नमूद केलं की,
“मी स्वतः नियमित वर्कआउट करतो, आणि आजपासून मी मॅकडोनाल्ड्समध्ये ‘प्रथिनयुक्त पर्याय’ असलेलं अन्न खाताना अजिबात संकोच करणार नाही.”

कार्यक्रमाच्या समारोपात त्यांनी मॅकडोनाल्ड्सच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत असं सांगितलं की,
“आरोग्यदायी खाद्यसंस्कृती घडवण्याच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल आहे आणि महाराष्ट्र शासन या उपक्रमासाठी नेहमीच सकारात्मक आणि सहकार्यात्मक राहील.” AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *