मीरा भाईंदरच्या नवीन नाट्यगृहातील पहिलाच नाट्यप्रयोग रद्द

 मीरा भाईंदरच्या नवीन नाट्यगृहातील पहिलाच नाट्यप्रयोग रद्द

भाईंदर,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरातील पहिल्या भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे दिमाखदार लोकार्पण करण्यात होते. या नाट्यगृहात होणारा नाटकाचा पहिला वहिला प्रयोग नाट्यगृहातील तांत्रिक तृटींमुळे रद्द करण्यात आला आहे.

उद्या (रविवारी दि.13) या नाट्यगृहामध्ये  ३८ कृष्ण’ वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र नाटकाच्या दोन दिवसापूर्वी नाटक व्यवस्थापकांनी नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहातील ध्वनीक्षेपक यंत्रणातील बिघाड आणि आवश्यक असलेल्या लाईटची सुविधा सुरळीत नसल्याचे आढळले. त्यामुळे नाटक रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक यंत्रातील बिघडाची बाब समोर आली होती. याबाबत पालिकेकडे तक्रारही करण्यात आली होती.

परंतु या तांत्रिक बाबी सुधारण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे आता या बहुचर्चित नाट्यगृहातील पहिला नाट्यप्रयोग रद्द करण्याची नामुश्की ओढवली आहे. नाट्यरसिकांमध्ये यामुळे कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या या वास्तूत राहून गेलेल्या तांत्रिक तृटींमुळे बांधकामापूर्वी याचा योग्य अभ्यास झाला होता का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

याबाबत बोलताना पालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनी पुढील खुलासा केला आहे.

“नाटक व्यवस्थापकांनी परस्पर नाटक रद्द करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक ते बदल करून येत्या काही दिवसात नाटकाचा हा प्रयोग घेतला जाईल.”

दरम्यान याबाबत अभिनेते गिरिश ओक यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील विशेष महत्त्वाची ठरते.

“नाट्यगृहाची निर्मिती करत असताना त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने या नाट्य गृहात ते काम झालेले नाही.त्यामुळे आम्ही प्रयोग रद्द करत आहोत.”- गिरीश ओक, अभिनेते

SL/KA/SL

12 Nov. 2022

 

 

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *