कचखाऊ आणि अपमान सहन करणाऱ्या सरकारविरुद्ध १७ तारखेला मविआ चा मोर्चा
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, सीमा भागा बाबत कचखाऊ धोरण स्वीकारणाऱ्या सरकारच्या विरोधात मविआ ने मोर्चा पुकारला आहे.Mawia march on 17th against the government which tolerates corruption and insults
राज्यपालांनी वारंवार केलेली वक्तव्ये , राज्या बाहेर जाणारे उद्योग , सीमा वादावर गप्प बसणारे सरकार , कर्नाटकचे मुख्यमंत्री विरोधात बोलत असताना ही आपले मुख्यमंत्री गप्प बसले आहेत, सोलापूर, सांगली , नाशिक , नांदेड येथील नागरिक पर राज्यात जायची भाषा करीत आहेत , तिथे बंद पाडलेली विकास कामे आदी मुद्दे घेत आज महा विकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचे आयोजन केल्याचे त्यांनी जाहीर केले.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, Former Chief Minister Uddhav Thackeray विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडत शिंदे , फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यपाल बदलण्यात आले तरी राणीच्या बागेपासून आझाद मैदानात जाणारा हा मोर्चा काढण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करीत समविचारी मंडळींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
ML/KA/PGB
5 Dec .2022