मठ, मंदिरे , आश्रम ही हिंदू समाजाची उर्जास्थाने …
पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती श्री शिवाजी महाराज आपले आदर्श असून आपली मठ, मंदिरे , आश्रम ही हिंदू समाजाची उर्जास्थाने आहेत शास्त्र, साधू संत, तीर्थ स्थाने, तीर्थ यात्रा, मठ मंदिरे या सर्वांच्या माध्यमातून आपली संस्कृती रक्षण आणि संवर्धन होत असते ही केंद्रे अधिकाधिक ऊर्जामय करून आपल्या राष्ट्राला भारत देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनवू या असे आवाहन अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले आहे.
ते काल शिवचैतन्य जागरण यात्रे मधील भव्य संत संमेलनात चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात बोलत होते. व्यासपीठावर मोरया गोसावी मंदिराचे चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, श्री उमाप , विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू चे मुख्य विश्वस्त, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज मोरे तसेच संस्कृती संवर्धन विकास महासंघ पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष ह.भ. प.किसन महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज कायम देव,देश अन् धर्म, गो रक्षणासाठी कायम अग्रेसर होते त्यांचाच आदर्श आपण घेऊन पुढील काळात राष्ट्रकार्यार्थ आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आगामी निवडणुकीत देव, देश धर्म रक्षणासाठी, हिंदुत्व व समरसतेसाठी १००% परिवारासह मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या संत संमेलनाला विविध संत महंत यांचे सह शहरातील मठ मंदिरांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.
ML/ML/SL
6 Oct. 2024