माथेरानची मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपासून पुन्हा रुळावर
अलिबाग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ – माथेरान मार्गावर माथेरानची मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार आहे. नेरळ – माथेरान मार्गावर रुळावर येणारे पाणी थांबविण्यासाठी येथील वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत.
पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येत आहेत. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचे नुकसान होते.
पावसाळ्याच्या महिन्यात माथेरान राणी अर्थात टॉय ट्रेनचा एक मार्ग बंद केला जातो. पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे टॉय ट्रेन बंद ठेवली जाते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामासाठी ५ कोटींचा खर्च लागणार आहे. मध्य रेल्वेकडून संपूर्ण काम होण्यासाठी १२ महिने लागणार आहेत. तर कंत्राटदारांसाठी निविदा जारी केली आहे. रुळावरील माती बाजूला करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जात आहे. मागील वर्षांत देखील मध्य रेल्वेने माथेरानच्या ट्रेनसाठी विविध काम केली आहेत. यादरम्यान, मध्य रेल्वेने ८ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत नेरळ – अमन लॉजपर्यंतची सेवा रद्द केली होती.
ML/ML/SL
9 Oct. 2024