पावासाळ्यात बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा सुरु….
अलिबाग दि ६ – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात
असलेल्या माथेरान येथील मिनी ट्रेन ही माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळहून माथेरान ला जाणण्यासाठी एक पर्वणी असते. इंग्रजाच्या काळापासून ही ट्रेन आजतागायत सुरु आहे. दरवर्षी फक्त पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते.
आजपासून पुन्हा ही ट्रेन नेरळ ते माथेरान सुरू करण्यात आली असून त्यामुळे नेरळ येथे आलेल्या पर्यटकांमध्ये आनंद पहायला मिळाला. पावसाळा संपल्याने ती पुन्हा सुरू होत आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान या टप्प्यात शटल सेवा धावत आहेत.
पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑक्टोबर दरम्यान ही मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येते.
पावसाळा संपल्याने ती पुन्हा सुरू होत आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान या टप्प्यात शटल सेवा धावत आहेत.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला तीन द्वितीय, एक पारदर्शी (व्हिस्टाडोम), प्रथम आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामानवाहू असे सहा डबे आहेत.
सोमवार ते शुक्रवार दरम्यान अमन लॉज ते नेरळदरम्यान रोज सहा फेऱ्या धावतात. शनिवारी आणि रविवारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन फेऱ्या वाढवून एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतात. रेल्वे प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन माथेरान मिनी ट्रेनने तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.ML/ML/MS