मतदान चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कुरबुरीना सुरुवात

 मतदान चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कुरबुरीना सुरुवात

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र विधानसभेच्या १५ व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानानंतर लगेचच काल अनेक मतदाणोत्तर अंदाज जाहीर झाले , त्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे दिसून आले तरी बऱ्याच चाचण्यांमध्ये महायुती आघाडीवर असल्याचे सांगितले गेले आहे मात्र एकीकडे या चाचण्या जाहीर होत असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कुरबुरीना सुरुवात झाल्याचे दिसून आला आहे.

आज महाविकास आघाडी संजय राऊत विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यावर हा संघर्ष उफाळला आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल असे नाना पटोले यांनी म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला आहे तर दुसरीकडे महायुतीत देखील विसंवाद असल्याचे दिसले आहे . एकनाथ शिंदे ज्या दिशेला जातील त्या दिशेला आम्ही जाऊ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी दिल्यामुळे शिंदे यांच्या गटात काही वेगळा हालचाली सुरू आहेत का याबद्दल शंका उत्पन्न होत आहेत.

काल मतदान उत्तर चाचण्या जाहीर झाल्या त्यात प्रदीप गुप्ता यांच्या ॲक्सिस ने आपल्या चाचण्या जाहीर केल्या नव्हत्या त्यांनी त्या आज जाहीर केल्या त्यानुसार ते महायुतीच्या दिशेने कल देत असून महाविकास आघाडी विरोधी बाकांवर बसेल असे म्हणत आहेत.

राज्यात काल मतदानानंतर, विविध सर्वेक्षण संस्थानी केलेल्या एक्झिट पोल म्हणजेच, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई होत असल्याचं दिसत आहे. मात्र त्यातल्या त्यात महायुती बहुमतापर्यंत पोहोचेल, असा अंदाज बहुतांश पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे. पोल डायरीच्या चाचणीनुसार महायुतीला १२२- ते १८६ तर मविआला ६९ ते १२१ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यनं महायुतीला १५२ ते १६० तर मविआला १३० ते १३८ जागा दाखवल्या आहेत. मॅट्रिसच्या पोलनं महायुतीला १५० ते १७० तर मविआला ११० ते १३० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर इलेक्टोलर एज या संस्थेनं मात्र मविआला १५० तर महायुतीला १२१ जागांचा अंदाज वर्तवला आहे.

या निवडणुकीत, अपक्षांना पंधरा ते २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण लढती, यामुळे मोठा फरक पडू शकतो. मनसेसह अपक्षांची भूमिका महत्वाची ठरू शकते.

ML/ML/PGB 21 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *