मास्टर ब्लास्टरचे अर्धशतक

 मास्टर ब्लास्टरचे अर्धशतक

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवृत्तीनंतरही करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरचा आज ५० वा वाढदिवस. क्रिकेटप्रेमींच्या या लाडक्या तेंडल्याच्या अर्धशतकी आणि तुफान यशस्वी अशा वाटचाली बद्दल त्याच्यावर समाजमाध्यमांमधुन शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. वाढदिवसानिमित्त सचिनने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले असून एकूण ३४,३५७ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. सचिनला क्रिकेटमधून निवृत्त होऊन १० वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण चाहते आजही त्याच्यावर मनापासून प्रेम करतात.
सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि २०१३ मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,हजार धावांचा टप्पा गाठणारा सचिन तेंडुलकर हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. भारतीय संघाकडून खेळताना त्याने अनेक विक्रम केले आणि क्रिकेटजगतात वेगळी छाप निर्माण केली आहे.

त्याने कसोटीत ५१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतक ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरने आज त्याच्या वाढदिवसाची सुरुवात स्विमिंग पूलच्या कडेला निसर्गाच्या सानिध्यात बसून केली, ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिन तेंडुलकरने टी टाईम, ५० नॉटआऊट असे लिहले आहे.

SL/KA/SL

24 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *