हाजी मस्तान मिर्झा यांनी स्थापन केलेला भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार

 हाजी मस्तान मिर्झा यांनी स्थापन केलेला भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार

पुणे, दि, २०: आगामी पुणे महानगर पालिका निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, सामान्य मतदारांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रस्थापित राजकीय पक्ष दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघाने केला आहे. सर्वसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीवासीय तसेच अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तौसिफ अब्बास शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला अकिल पठाण,अस्लम सय्यद,अब्बू बकर सकलेनी,संतोष शिंदे,मयूर गायकवाड अश्फाक खान,अवेज नाकेदार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हाजी मस्तान मिर्झा यांनी स्थापना केलेला महासंघ

पुढे बोलताना तौसिफ शेख म्हणाले, “भारतीय माईनॉरिटीज
सुरक्षा महासंघाची स्थापना 1983 च्या दशकात हाजी मस्तान मिर्झा यांनी केली. आज महासंघाचा विस्तार देशभर झाला आहे. हा पक्ष फक्त मुस्लिम समाजापुरता मर्यादित नाही, तर सिख, ख्रिश्चन, दलित अशा सर्व अल्पसंख्याक घटकांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. महासंघात या सर्व समाजांचे प्रतिनिधी सक्रिय आहेत.”

सामान्य नागरिकांना प्रतिनिधित्व न मिळण्याची खंत

तौसिफ शेख पुढे म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्ष धनदांडगे उमेदवारांना प्राधान्य देतात. त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार निवडणूक प्रक्रियेतून बाहेर राहतात. पुणे शहरात अनेक गंभीर समस्या असताना त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. नागरिकांच्या प्रश्नांवर बोलणारा कोणीही नसल्यामुळे आम्ही पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुण्यात मजबूत संघटन रचना

पुणे शहरात महासंघाचे चांगले नेटवर्क असून शहरातील सर्व मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. “आमचे कार्यकर्ते सर्वसामान्य घरातून आलेले आहेत. झोपडपट्टीधारकांच्या समस्या, सोसायट्यांमधील प्रश्न, आणि शहरातील दैनंदिन अडचणी आम्हाला जवळून माहित आहेत. त्यावर उपाययोजना कशा करता येऊ शकतात याचा अभ्यास आम्ही केला असून त्यादृष्टीने मार्गक्रमणा निश्चित केली आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रभागांत आमचे उमेदवार उभे राहतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *