हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ
जळगाव, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भासह हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हातनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले असून, पाणी पातळी सातत्याने वाढ होत असल्याने अजून दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हातनुर धरणातून तापी नदी पात्रात 98 हजार 670 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ML/ML/SL
2 Sept 2024